पश्चिम बंगालच्या निकालानंतर शरद पवारांकडून सूचक ट्विट !

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षाला पराभवाची धुर चारत एकहाती विजय खेचून आणला आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी ट्विट करुन सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, या विस्मयचकित करणाऱ्या विजयासाठी मी तुमचे अभिनंदन करतो. आपण भविष्यात लोकांच्या कल्याणासाठी एकत्रपणे काम करणे सुरु ठेवुयात. तसेच कोरोनाच्या संकटाचाही मिळून मुकाबला करुयात, असे शरद पवार यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

आता संपूर्ण देशाचे लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार, असे संकेत मिळत आहेत. सध्याच्या आकेडवारीनुसार, तृणमूल काँग्रेस २०४ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा ८६ जागांवर आघाडीवर आहे. तसेच कालच राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी भाजपाला ३ अंकी जागा मिळाल्या तर मी राजकारण सोडून देईल असे विधानत केले होते आता त्यांचे हे विधान खरे ठरताना दिसत आहे.

आतापर्यंतच्या निकालाचा कल पाहता तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये सहजपणे सत्तास्थापन करेल, असे दिसत आहे. तर ‘अब की बार 200 पार’च्या वल्गना करणारा भाजप 100 जागांचा टप्पाही ओलांडेल की नाही, याबाबत शंका आहे. कोरोनामुळे मतमोजणीची प्रक्रिया संथरित्या सुरु आहे. त्यामुळे निकाल पूर्णपणे स्पष्ट होण्यासाठी संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागेल. मात्र, तुर्तास तरी ममता बॅनर्जी यांनी भाजपचे आक्रमण थोपवून पश्चिम बंगालचा गड राखला, असेच म्हणावे लागेल.

 

Team Global News Marathi: