पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांचे सूचक विधान !

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांचे सूचक विधान !
पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षाला पराभवाची धुर चारत एकहाती विजय खेचून आणला आहे. पश्चिम बंगालच्या निकालावर महाराष्ट्रातूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विधानानंतर आता राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी पश्चिम बंगालच्या निकालावर महत्वपूर्ण विधान केले आहे.

पश्चिम बंगालच्या लोकांनी भाजपाच्या गद्दारीला चपराक दिली, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. आज मोदींचा करिष्मा आता ओसरला आहे याची जाणीव पश्चिम बंगालच्या निकालाने संपूर्ण देशाला आता झाली आहे. करिष्म्यापेक्षा राज्याचा विकास कोण करु शकतो, मातीशी कोण जुळला आहे याचा विचार मदतारांनी केला. मोदींकडे जे लोक गेले होते ते ममता दीदींचेच अपत्य होते. त्यामुळे लोकांनी ‘लाश वही है, बस कफन बदल गया है’, अशा प्रकारची हुशारी दाखवली अशी रोखठोक टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये २९२ जागांसाठी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आलं होतं. यात सध्याच्या आकडेवारीनुसार २०७ जागांवर ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेसचा पक्ष आघाडीवर आहे. तर भाजपला फक्त ८१ जागांवर आघाडी मिळाली आहे. प.बंगालमध्ये बहुमताचा आकडा १४७ इतका आहे. पश्चिम बंगालच्या जनतेनं राज्याचं नेतृत्व कोण करू शकतो. जनतेच्या कामांसाठी कोण पुढे येऊ शकतो. याचा विचार करुन ममता बॅनर्जी यांच्यावर जनतेनं पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे असे सुद्धा बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: