तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्या विजयानंतर मंत्री उदय सामंत यांचे सूचक विधान !

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षाला पराभवाची धुर चारत एकहाती विजय खेचून आणला आहे. पश्चिम बंगालच्या निकालावर महाराष्ट्रातूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विधानानंतर आता उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले आहे.

मंत्री सामंत म्हणाले की, सुरुवातीला ममतादीदी एकट्या पडल्या असं वाटत होतं पण त्या सगळे आघात सहन करत दीदी लढल्या. या निवडणुकीकडे पूर्ण जगाचे लक्ष लागले होते. कोरोनाच्या काळात या निवडणूका होत होत्या. लोकशाहीच्या पद्धतीने ममतादीदींनी भाजपाला चपराक दिली आहे.’ असे विधान सामनात यांनी केले आहे. ते आज औरंगाबाद येथे आलेले असताना त्यांनीपत्रकार माध्यमांशी संवाद साधतं हे विधान केले आहे.

भाजपचं पश्चिम बंगालमधील यश मोठं आहे आणि ते कौतुकास्पदही आहे, कारण भाजपाने ८० जागापर्यंत मुसंडी मारली आहे. ही निवडणूक फक्त राज्याची नव्हती तर त्याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागले होते अशी प्रतिक्रिया सामंत यांनी दिली आहे. पश्चिम बंगालच्या लोकांनी भाजपाच्या गद्दारीला चपराक दिली, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. आज मोदींचा करिष्मा आता ओसरला आहे याची जाणीव पश्चिम बंगालच्या निकालाने संपूर्ण देशाला आता झाली आहे. असे विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

Team Global News Marathi: