काठमांडू : सध्या संपूर्ण देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने हाहाकार माजवायला सुरवात केली आहे. आज वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्यावर देशात लसीकरण मोहिमेला अधिक वेग आला आहे. मात्र आता चक्क भारतीय व्यापारी नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडूमध्ये जाऊन चिनी कंपनीची लस टोचून घेत असल्याची माहिती समोर येत आहे.
या संदर्भात समोर आलेल्या माहितीनुसार दिल्ली तसेच इतर ठिकाणचे काही भारतीय व्यापारी काठमांडुला जाऊन चीन लसीचा डोस घेत असल्याची माहिती समोर आली आहे. चीनमध्ये व्यापार किंवा शिक्षण घ्यायचं असेल तर चीनी लसीचा डोस चीनी सरकारचे बंधनकारक केला आहे. काही दिवसांपुर्वीच नेपाळला ८ लाख लसींचा मोफत पुरवठा चीन सरकारनं केला आहे.
मात्र हे आरोप काठमांडु सरकारने फेटाळले आहे. भारत सरकारला याबद्दल रितसर माहिती दिल्याचही नेपाळ सरकारनं म्हटलं आहे. नेपाळच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते गणेश श्रीवास्तव म्हणतात, नेपाळमध्ये लस घ्यायची असेल तर ओळखपत्र दाखवणं गरजेचे आहे. तसेच लस घेणाऱ्यांचा रेकॉर्ड दफ्तरी ठवण्यात येत आहे.