२०१४ पासून भारत अमेरिकेचा गुलाम, ह्या काँग्रेस नेत्यांचे वादग्रस्त विधान

 

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रानौत हिने भारताच्या स्वातंत्राबद्दल वादग्रस्त विधान करून अनेकांचा रोष अंगावर ओढावून घेतला होता, तसेच तिच्या विरोधात अनेक ठिकाणी पोलीस स्थानकात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. आता त्या पाठोपाठ एका बड्या काँग्रेस नेत्यांने भाजपा सत्तेत आल्यानंतर अमेरिकेचा गुलाम झाला आहे असे वादग्रस्त विधान करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. इंडो-रशिया फ्रेंडशिप सोसायटीच्या एका कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अय्यर म्हणाले की, २०१४ पासून आपण अमेरिकेचे गुलाम झालो आहोत असे विधान त्यांनी केले आहे.

काँग्रेस नेते अय्यर पुढे म्हणाले की, ‘अमेरिकेसोबत तणाव होता, पण मॉस्कोसोबतचे आमचे संबंध कधीही इतके तणावपूर्ण नव्हते. भाजपचे सरकार आल्यापासून परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. गेल्या ७ वर्षात आपण पाहत आहोत की, गुटनिहाय चर्चा होत नाही, शांततेची चर्चा होत नाही. आपण आज अमेरिकन गुलाम बनून बसलो आहोत. भारत आणि रशियाचे संबंध जुने आहेत, मात्र मोदी सरकार आल्यापासून हे नाते कमकुवत झाले आहे. २०१४ पासून आपले रशियाशी असलेले संबंध खूपच कमी झाले आहेत.’

ते पुढे म्हणाले, ‘रशिया नेहमीच आमच्या पाठीशी उभा राहिला आहे. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या प्रयत्नांमुळे रशियाचे आपल्याशी असलेले संबंध सर्वच बाबतीत दृढ झाले होते. तेव्हा इंदिरा हे रशियन नाव झाले होते. अनेक मुलींचे नाव इंदिरा ठेवण्यात आले आणि हे सर्वात जास्त उझबेकिस्तानमध्ये घडले असे सुद्धा त्यांनी इंडो-रशिया फ्रेंडशिप सोसायटीच्या एका कार्यक्रमात बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: