भारताला ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर स्वातंत्र्य मिळालंय, भाजपाच्या नेत्याचा अजब दावा

 

नवी दिल्ली | भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी सतत वादग्रस्त विधाने करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणी वाढण्याचे काम करताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच आता थेट भारताला स्वतंत्र ९९ वर्षाच्या करारावर भेटल्याचा दावा भाजप प्रवक्त्या रूची पाठक यांनी केलेला आहे. आता तात्यांच्या या दवण्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर आणि भाजपावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

एका मीडिया डिबेटदरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून सर्वांनाच धक्का बसला.” भारताला स्वातंत्र्य आता मिळालंच नाही. भारताला स्वातंत्र्य ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर मिळालं आहे. देश हा पूर्णपणे स्वतंत्र नाही. याबाबत लेखी करार करण्यात आला होता,” असं अजब वक्तव्य झांसीमधील भाजप प्रवक्त्या रूची पाठक यांनी केलं. यानंतर अनेक ठिकाणाहून त्यांच्यावर टीका करण्यात आली.

सोशल मीडियावरुन अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. अनेकांनी त्यांना व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीचं टॉपर असं संबोधलं. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मात्र त्यांनी माघार घेतल्याचं दिसून आलं. आपल्याला जी माहिती मिळाली ती सोशल मीडियाद्वारे (Social Media) मिळाल्याचं त्या म्हणाल्या. तसंच यावेळी त्यांनी राजीव दीक्षित यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला.

Team Global News Marathi: