पुढील अनेक वर्षे देशात भाजपाचंच वर्चस्व राहणार, प्रशांत किशोर यांचे सूचक विधान

 

मागच्या अनेक दिवसांपासून काँग्रेसच्या संपर्कात असलेले राजकीय विश्लेक्षक प्रशांत किशोर यांनी एक मोठे विधान केले आहे. भाजपा येणाऱ्या अनेक दशकांमध्ये भारतीय राजकारणात एक प्रबल शक्ती म्हणून कायम राहणार आहे. त्यामुळे भाजपाविरोधात अनेक दशके लढावे लागेल. ४० वर्षांपूर्वी ज्याप्रमाणे काँग्रेस सत्तेचे केंद्र राहिली होती. त्याचप्रमाणे भाजपा हरो अथावा जिंको ती सत्तेच्या केंद्रामध्ये कायम राहील असं मत प्रशांत किशोर यांनी मांडले आहे.

एका कार्यक्रमात संवाद साधताना प्रशांत किशोर यांनी सांगितले की, लोक मोदींना कंटाळले आहेत आणि त्यांना सत्तेतून बाहेर काढतील, या भ्रमात अजिबात राहू नका, कदाचित जनता मोदींना सत्तेच्या बाहेर काढतील. पण भाजपा कुठेही जात नाही आहे. त्यासाठी तुम्हाला अनेक दशकांपर्यंत लढावे लागेल. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे/

यावेळी प्रशांत किशोर म्हणाले की, याबाबतीत राहुल गांधींची एक अडचण आहे. कदाचित काही काळातच जनता नरेंद्र मोदींना सत्तेतून हटवेल, असे त्यांना वाटते. मात्र असे होणार नाही. जोपर्यंत तुम्ही मोदींच्या शक्तीचा अंदाज घेत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना हरवण्यासाठी प्रतिकार करू शकणार नाही. बहुतांश लोक त्यांची ताकद समजून घेण्यासाठी वेळ देत नाही आहे. अशी कोणती बाब आहे जी त्यांना लोकप्रिय बनवत आहे, हे जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना रोखू शकणार नाहीत.

Team Global News Marathi: