सुसाईड नोटमध्ये अर्णवचे नाव असताना फडणवीसांनी का विधानसभा हादरून सोडली नाही

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांकडून अन्वय नाईक प्रकरणी होत असलेल्या आरोपांना आता अन्वय नाईक कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेऊन सडेतोड उत्तर दिले आहे. अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलगी आज्ञा नाईक पत्रकार परिषदेत बोलत होत्या. .

हिरेन प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रकारे विधानसभा हादरवून ठेवली तशीच भूमिका अन्वय नाईक प्रकरणात का घेतली नाही. अन्वय नाईक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही. फकीर ऐरावला जामीन दिलेला आहे. मात्र फडणवीसांना त्यांची निर्दोष मुक्तता केली असल्याचे सांगून दिशाभूल केली आहे असा आरोप आज्ञा नाईक यांनी लगावला होता.

अन्वय नाईक यांच्या प्रकरणावरून लावण्यात आलेल्या आरोपावरून गुरुवारी पाटकर परिषेद घेऊन देवेंद्र फडणवीस आणि भारीत्या जनता पक्षाचा चांगलाच समाचार घेतला होता.यावेळी या दोघींनी मनसुख हिरेन प्रकरणाचा दाखला देत भाजपला धारेवर धरले.

एका व्यक्तीला दोन ते तीन दिवसांत न्याय मिळतो. फक्त संशयावरुन अधिकाऱ्याची बदली केली जाते. मात्र, आमच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला, सुसाईड नोटमध्ये आरोपींची नावे स्पष्टपणे आहेत. मग तेव्हा भाजपने विधानसभा हादरवून का सोडली नाही, असा सवाल अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी केला.

Team Global News Marathi: