मोठी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टोचून घेतली कोरोनाची लस

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईमधील जे. जे. रुग्णालयामध्ये करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. आज दुपारी १२:३० च्या सुमारास त्यांनी कोरोनाची लस टोचून घेतली आहे. तसेच यावेळी त्यांचे पुत्र मंत्री आदित्य ठाकरे आणि स्वीय सहाय्यक मिलींद नार्वेकर उपस्थित होते.

यावेळी करोना लसीसंदर्भातील संभ्रम दूर व्हावा या हेतूने उद्धव ठाकरेंनी करोनाची लस घेतली असून सर्वांनीच लसीकरणाच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हावे असा संदेश देण्यासाठी राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी लस घेतली आहे.

उद्धव ठाकरे यांनी या पुनावाला यांच्या सिरम कंपनीने बनवलेली कोव्हिशिल्ड ही लस टोचून घेतल्याची माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरेंबरोबरच त्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनीही करोनाची लस घेतली आहे.

तसेच करोना लसीकरणासंदर्भातील संभ्रम दूर व्हावा आणि जास्तीत जास्त लोकांनी या लसीकरणामध्ये सहभागी व्हावे यासाठी राजकीय नेत्यांनी, सेलिब्रिटींनी आणि समाजातील प्रभावशाली व्यक्तींनी पुढाकार घेत लसीकरण केलं पाहिजे असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे

Team Global News Marathi: