…मग तन्मय फडणवीस याने लस कशी घेतली, महाराष्ट्र काँग्रेसचा सवाल !

सध्या संपूर्ण देशभरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यात मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. त्यात लसीचा तुटवडा सुद्धा राज्यात मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. याच मुद्द्यावरून विरोधक आघाडीला घेरत असताना दुसरीकडे फडणवीसांच्या पुतण्याने घेतलेल्या लसीमुळे आता नवा वाद निर्माण होण्याचे चिन्ह दिसून येत आहे.

पुतण्या तन्मय फडणवीसने लस घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्यावरून प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. महाराष्ट्र काँग्रेसनेही यावरून काही शंका उपस्थित केल्या असून, भाजपावर गंभीर आरोप केला आहे. देशात ४५ वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येत असताना फडणवीसांच्या पुतण्याला कमी वयात कशी काय लस देण्यात आली आहे असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याने लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर फोटो पोस्ट केला होता. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून आपण दुसरा डोस घेतल्याचं त्याने म्हटलं होतं. यावरून महाराष्ट्र काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला आहे. तन्मय फडणवीस याचा लस घेतानाचा फोटो पोस्ट करत काँग्रेसने काही सवाल भाजपाला केले आहेत.

“नाव… तन्मय फडणवीस, कोण… देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या. तन्मय फडणवीस ४५ वर्षांपेक्षा मोठा आहे का?, तन्मय फ्रंटलाईन वर्कर आहे का?, आरोग्य कर्मचारी आहे का? जर नसेल, तर त्याला लस दिलीच कशी काय गेली? भाजपाकडे रेमडेसिवीरप्रमाणेच लसींचा सुद्धा गुप्त साठा आहे का?,” असे प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे. आता यावर फडणवीस काय उत्तर देणार हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: