कुडाळमध्ये नारायण राणेंना शिवसेनेचा जोरदार ‘दे धक्का’

 

सिंधुदुर्ग | शिवसेना आणि मंत्री नारायण राणे कुटुंबीय यांचे वैर सर्वश्रुत आहे त्यातच आता काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राणे यांनी सेनेला जोरदार धक्का दिला होता आता त्याचा वचपा काढण्यासाठी कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत राणे यांच्या पॅनेलला धक्का देत शिवसेनेने सात जागा जिंकल्या आहेत.

तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाने दोन जागांवर विजय मिळवला आहे. अशा प्रकारे शिवसेना आणि काँग्रेस यांनी एकूण ९ जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपने या निवडणुकीत ८ जागांवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेना आणि काँग्रेसच्या सर्वाधिक जागा असल्याने या ठिकाणी शिवसेनेची सत्ता येणार आहे.

तसेच कर्जत नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने धडाकेबाज विजय भाजपला नगर जिल्ह्यातील कर्जत येथून मोठा धक्का बसला आहे. कारण भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी ज्या मतदारसंघात सर्वाधिक प्रतिष्ठा पणाला लावली होती त्या जागेवर भाजपचा पुन्हा पराभव झाल्याचं चित्र दिसून आले आहे.

Team Global News Marathi: