शाळा सुरु करण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची महत्वाची माहिती

 

मुंबई | कोरोनाचा पुन्हा संसर्ग वाढल्याने राज्यात नव्याने निर्बंध लावण्यात आले असून कोरोनाची तिसरी लाट आली तरी तिचा धोका कमी दिसून येत आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील शाळा बंद करण्याचा पुन्हा निर्णय घेण्यात आला. तसेच येत्या १५ फेब्रुवारी पर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर शाळा बंद कराव्या लागल्यात. आता पुन्हा शाळा सुरु करण्याची मागणी होत आहे. राज्यात पुन्हा शाळा सुरु करायच्या की नाहीत, याबाबत उद्या मंत्रिमंडळात चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मंत्री राजेश टोपे यांनी Vaccine On Wheels याचे उदघाटन केले. त्यानंतर त्यांनी शाळाबाबत माहिती दिली. दुचाकीवरून पुण्यात ठिकठिकाणी जाऊन कोरोनाची लस दिली जात आहे. हा स्तुत्य उपक्रम आहे, याची व्याप्ती वाढावी, असे ते म्हणाले. लस देण्याची गती वाढवायची आहे. रुग्णसंख्या कमी होत आहे, रुग्णसंख्या स्थिर होत आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. मृत्यू होत नाहीत, ऑक्सिजन लागत नाही, व्हेंटिलेटरवर लागत नाहीत, परिस्थिती नियंत्रणात आहे, असे राजेश टोपे म्हणाले.

Team Global News Marathi: