बैठकीत मुजरा अन् मीडियात गोंधळ अशी नाना पटोलेंची अवस्था !

 

मुंबई | OBC आरखनाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे. त्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी OBC आरक्षणाच्या मुद्द्यावरून केलेल्या विधानाचा आता भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा अशा प्रकारे नाना पटोले यांचा बैठकीत मुजरा आणि मीडियात गोंधळ चालला आहे. एक गोंधळी नाना म्हणून नवं कॅरेक्टर या निमित्ताने महाराष्ट्राला बघायला मिळालं अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नाना पटोलेंवर हल्लाबोल केला आहे.

सर्व पक्षीय ओबीसी बैठकीमध्ये ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय निवडणुका होऊ नये यावर एकमत झाले आहे. मात्र ओबीसींचे राजकीय आरक्षण भाजपमुळे गेले असल्याची टीका नाना पटोले यांनी केली होती. यावर भाजप कडून प्रवीण दरेकर यांनी नानांच्या आरोपाचा कडक शब्दात समाचार घेतला.

दरेकर म्हणाले, नाना पटोले यांचा नवा चेहरा महाराष्ट्राला पाहायला मिळाला आहे. आपल्याकडे एक चित्रपट आहे गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा तर नानांचा बैठकीत मुजरा आणि मीडियात गोंधळ असं एक गोंधळी नाना पटोले म्हणून नवं कॅरेक्टर महाराष्ट्राला पाहायला मिळालं अशी टीका दरेकरांनी केली. आता दरेकर यांच्या टीकेवर नाना पटोले काय उत्तर देतायत हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: