दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात शेतकरी कमी आणि दलाल जास्त – सदाभाऊ खोत

दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात शेतकरी कमी आणि दलाल जास्त – सदाभाऊ खोत

सध्या देशभरात शेतकरी कृषी कायद्याविरोधात जोरदार आंदोलन सुरु झाले आहेत. त्यात उद्या मंगळवारी शेतकरी कायद्याविरोधात विविध संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. तसेच राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने या बंदला आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यात माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून महाएल्गार आंदोलनाला सुरवात केली आहे.

दरम्यान, दिल्ली-पंजाबमध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनाच्या उद्रेकात शेतकरी कमी आणि दलालच जास्त आहेत. त्यामुळे ते आंदोलन चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. त्यात शेतकरी हितापेक्षा बाजार समितीतील दलाल व इतर घटकांच्याच हिताचा जास्त विचार केला आहे, अशी टीका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले की, केंद्र सरकारने बनविलेल्या कृषी कायद्यांच्या माध्यमातून अखेरीस शेतकऱ्यांचे हितच साधले जाणार आहे. या कायद्यामुळे शेतमालाच्या विक्रीसाठी जागेचे बंधन नसेल. शेतीविषयक करारांमुळे मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार असेल.

ग्लोबल न्युज नेटवर्क: