दिवाळी संदर्भात पुणे मनपाची नियमावली जाहीर

 

पुणे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनाने यंदाही मागच्या वर्षीप्रमाणे दिवाळी संदर्भातील नियमावली काढली आहे. यामध्ये यावर्षी विदेशी फटाक्यांच्या विक्रीला पुणे शहरात पुर्णपणे बंदी घालण्यात आली असून अशा सूचना फटाके विक्रेत्यांना देण्यात आलेल्या आहे.. यासंदर्भातील सूचना पोलिस आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत.

पोलिस आयुक्त कार्यालयाने दिवाळी सणासाठी फटाके विक्रीचे परवाने दुकानदारांना दिले आहेत. मात्र यामध्ये काही अटीही आयुक्त कार्यालयाने घालून दिलेल्या आहेत. याबाबतची नियमावलीदेखील या दुकानदारांना दिली आहे. या दुकानदारांना २७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरपर्यंत फटाके विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय नियमांचं उल्लघंन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचंही नियमावलीमध्ये म्हटलं आहे.

नियमावलीनुसार, दुकानदारांना विदेशी फटाके विकता येणार नाहीत. तसेच मुदत संपलेले फटाके किंवा शोभेच्या दारूची विक्रीही दुकानदारांना करता येणार नाहीये. याशिवाय फटाकेविक्रीची मुदत संपल्यानंतर शिल्लक राहिलेले फटाके परवाना असलेल्या गोदामात परत करणे दुकानदारांना बंधनकारक असणार आहे. तसेच दिवाळीमध्ये नागरिकांनाही काही नियमांचे पालन करावं लागणार आहे.

Team Global News Marathi: