लस देण्याच्याबाबतीत ‘सीरम’ने महाराष्ट्राचा प्रथम विचार करावा – राजेश टोपे

सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाने हाहाकार मजवायला सुरवात केली आहे. त्यात रुग्णसंख्या सुद्धा मोठया संख्याने वाढताना दिसत आहे. त्यातच कोरोनाला रोखण्यासाठी सपूर्ण देशभरात लसीकरण युद्ध पातळीवर सुरु आहे. मात्र आज अनेक राज्यांमध्ये लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर आता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सिरमचे प्रमुख अदर पुनावाला यांच्याकडे लस पुरवठा संदर्भात मागणी केली आहे.

महाराष्ट्रातील पुण्यात सीरम इन्स्टिट्यूट ही असल्यामुळे लस देण्याच्याबाबतीत अदर पूनावाला यांनी महाराष्ट्राला काहीसे झुकते माप द्यावे, अशी विनंती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात दररोज मोठ्यासंख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. त्यातच १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यालाही केंद्राच्या निर्देशाप्रमाणे सुरूवात झाली आहे. पण, राज्य सरकारकडून हा लसीकरणाचा टप्पा लस तुटवड्यामुळे राबवताना अडथळे येत असल्याचे सांगितले जात आहे.

या पार्श्वभूमीवर आज आरोग्यमंत्री टोपेंनी सीरमचे पूनावाला यांना ही विनंती केल्याचे दिसत आहे. आमची विनंती अदर पूनावाला यांना आहे की, पुण्यातील ते असल्याने व महाराष्ट्रातच सीरम इन्स्टिट्यूट असल्यामुळे काहीही करून सीरम इन्स्टिट्यूटने झुकते माप हे महाराष्ट्राला दिले पाहिजे, असे त्यांनी प्रसार माध्यमांवर प्रतिक्रिया देताना म्हंटले आहे.

आम्हाला १८ ते ४४ लसीकरण कुठल्याही पद्धतीने करायचे असेल, यासाठी लागणारी किंमत ही राज्य सरकार लगेच द्यायला तयार आहे. परंतु आपल्याला अधिक जास्त झुकते माप मे व जून महिन्यात द्यायला हवे. जेणेकरून आपल्याला अधिक गतीने लसीकरण करता येईल. आज लस उपलब्ध नसल्याने, आपल्या जवळ निधी आहे आपण खर्च करायला तयार आहोत, विकत घ्यायला तयार आहोत पण लस उपलब्ध नसल्यामुळे आज आपल्याला १८ ते ४४ वयोगाटातील लसीकरण कमी गतीने करावे लागत असल्याचेही यावेळी राजेश टोपेंनी सांगितले.

Team Global News Marathi: