मुंबई | | उद्योजक राज कुंद्राला अश्लील व्हिडीओ प्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांची रावनगाई काही दिवसांपूर्वी पोलीस कोठडीत करण्यात आली होती. त्यातच राज कुंद्राच्या अटकेनंतर अनेक गोष्टींचा खुलासा झाला. अनेकांनी समोर येत याप्रकरणाविषयी अनेक खुलासे केल्याचं पाहायला मिळालं. अनेक आरोप-प्रत्यारोपांची खेळी पाहायला मिळाली. अशातच आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे.
राज कुंद्रा मुख्य आरोपी असलेल्या अश्लील व्हिडीओ प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी १५०० पानी पुरवणी आरोपपत्र दाखल केलं. या पुरवणी आरोपपत्रात काही साक्षीदार दाखवण्यात आले आहेत. यातच या प्रकरणी राज कुंद्राची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टीदेखील साक्षीदार बनणार असल्याचं समोर येत आहे.
राज कुंद्रा १९ जुलै २०२१ पासून तुरुंगात न्यायालयीन कोठडी भोगत आहे. त्याला अद्याप जामीन मिळालेला नाही. राज कुंद्राच्या जामीन अर्जावर आता आज १६ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर त्याच्या आणि शिल्पा शेट्टीच्या कुटुंबियांच्या अडचणींत वाढ झाली. राजच्या अटकेनंतर मीडियाचाही खूप प्रभाव त्यांच्या वैयक्तिक जीवनावर पडलेला पाहायला मिळाला होता आता या प्रकरणी आणखी कोणते माहिती समोर येते हे पाहावे लागणार आहे.