मनसुख हिरेन यांची गाडीतच हत्या, सचिन वांझे यांना तात्काळ अटक करा – देवेंद्र फडणवीस

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. हाच मुद्धा पकडून राज्यात विरोधी बाकावर बसलेल्या भारतीय जनता पक्षाने आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा डाव आखला आहे. याच विषयावरून आज पुन्हा एकदा सत्तधारी आणि विरोधक एकमेकांसमोर आले आहे.

त्यात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरन यांच्या मृत्यूप्रकरणात क्राइम ब्रांचचे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव घेतल्याने मोठी खळबळ उडाली होती. तसेच, सचिन वाझेंना अटक करा, असे देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात म्हटलं आहे.

यावेळी फडणवीसांनी विमल हिरेन यांचा अर्ज वाचून दाखविला. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी माझे पती चौकशीसाठी सचिन वाझे यांच्यासोबत गुन्हे शाखेत गेले. त्यानंतर ते १०. ३० वाजता आले. दिवसभर सचिन वाझेंसोबत होतो. असे त्यांनी मला सांगितले. २७ फेब्रुवारीला सकाळी माझे पती पुन्हा मुंबई गुन्हे शाखेत गेले आणि रात्री १०.३० वाजता आले.

त्यानंतर २८ फेब्रुवारीला पुन्हा एकदा सचिन वाझेंसोबत गेले आणि जबाब नोंदवला. जबाबाची प्रत घरी आणून ठेवण्यात आली. त्यावर सचिन वाझे यांचे नाव व स्वाक्षरीदेखील आहे असे हिरेन यांच्या पत्नीने जबाब नोंदवल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच, ३ मार्च रोजी माझे पती दुकान बंद करुन घरी गेले, त्यानंतर घरी आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की सचिन वाझेंनी मला सांगितलं की तु या प्रकरणात अटक हो मी तुला दोन दिवसांत जामिनावर सोडवतो असा आरोप फडणवीसांनीं लगावला आहे.

Team Global News Marathi: