‘फडणवीसांनी अन्वय नाईक प्रकरण दाबलं, शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचे मनसुख हिरेन प्रकरणावर जोरदार हल्ला

सध्या राज्यात मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावर राजकारण चांगलेच तापलेले दिसून येत आहे. त्यात आता शिववसेना आमदार भास्कर जाधव यांनी भाष्य करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस आणि तत्कालीन फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ साली मुख्यमंत्री असताना अन्वय नाईक प्रकरण दाबले. आता त्यांच्या पत्नीच्या विनंतीवरून ठाकरे सरकार याप्रकरणाची चौकशी करत आहे. सचिन वाझे याप्रकरणाचा तपास करत होते. ते पदावर कायम राहिले तर माजी मुख्यमंत्र्यांसह अनेकजण अडचणीत येतील. त्यामुळे भाजपकडून सचिन वाझे यांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप जाधव यांनी केला आहे.

यावर सविस्तर बोलताना आमदार जाधव म्हणाले की, ठाकरे सरकारने याप्रकरणाची चौकशी सुरु केल्यानंतर सचिन वाझे यांच्याकडे तपास देण्यात आला होता. त्यांनी अर्णव गोस्वामीला घरातून उचलून आणले. त्यामुळे आता सचिन वाझे पदावर कायम राहिले तर यांना बेड्या पडतील, या भीतीने विरोधक सचिन वाझे यांना लक्ष्य करत आहेत, असे असे जाधव यांनी बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: