बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या इतिहासामुळे महाराष्ट्रात दंगली घडल्या -संभाजी ब्रिगेड

 

पुणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका प्रसिद्ध वृत्तसमूहाला दिलेल्या मुलाखतीत बाबासाहेब पुरंदरे राष्ट्रवादीवर केलेल्या टिकेनंतर संभाजी ब्रिगेड आणि मनसे यांच्यात आता शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. मुलाखतीत राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादीवर आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर निशाणा साधला होता.

राज ठाकरेंच्या वक्तव्यावर बोलताना संभाजी ब्रिगेडने राज ठाकरे आणि शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका केली आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेलं इतिहास लेखन हे दंगलीचं स्त्रोत पसरवणारं आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात दंगली झाल्या, अशी टीका संभाजी ब्रिगेडने केली आहे. तुमच्यात हिंमत असेल तर चर्चेला या, असं खुलं आव्हान देखील त्यांनी दिलं आहे.

वायफळ गप्पा आणि उगाच जिभेला आलं म्हणून काहीही बोलू नका. महाराष्ट्राला वेठीस धरू नका. शाहू- फुले- आंबेडकरांच्या विचारांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे. त्याचं जतन करण्याचं काम आम्ही करतोय, असंही आखरे म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी राज ठाकरे यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलं होत. आता या टीकेला मनसे काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: