वाईन शॉपच्या रांगा चालतात, मंदिराच्या का नाही? दरेकरांचा आघाडीला सवाल |

 

मुंबई | राज्यात अद्यापही कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांनी मंदिरे खुली करण्यासाठी वेळोवेळी आंदोलने केली होती, आता पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मंदिराच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

मंदिर सुरू करावे ही आमचीही मागणी आहे. त्याच्यावर अनेक लोकांचे रोजगार अवलंबून आहेत. या सर्वांचा राज्य सरकारने विचार केला पाहिजे. नियमाच्या चौकटीत हवं तर मंदिरे उघडा, पण मंदिरे उघडली पाहिजेत, असं सांगतानाच एकीकडे डान्सबार, वाईन शॉप सुरू आहे. तिथे रांगा चालतात. फक्त मंदिराच्या रांगा चालत नाहीत. मंत्रालयात दारुच्या बाटल्या सापडतात. त्याही चालतात. मंत्रालयाचे मदिरालय करायला हे सरकार निघालं आहे. पण मंदिरे चालू करत नाही. सरकार नक्की काय निर्णय घेतं हेच कळायला मार्ग नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

तसेच नाना पटोले यांच्या टीकेचा सुद्धा दरेकरांनी समाचार घेतला होता. पटोले यांनी आधी स्वत:ची उंची वाढवावी. केवळ शारीरिक उंची वाढवून चालणार नाही. तर वैचारिक उंचीही वाढली पाहिजे. मोदींवर टीका करण्या इतपत आपलं कर्तृत्व नाही आणि तशी क्षमताही निर्माण केलेली नाही. त्यामुळे क्षमतेनुसार आणि औकातीनुसारच बोलावे, अशी टीका त्यांनी पटोलेंवर केली आहे.

Team Global News Marathi: