दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पैसे मिळायलाच हवेत, कृषी मंत्री दादा भुसे यांची कंपन्यांच्या प्रतिनिधींना तंबी 

 

 

राज्यात पडलेल्या धोधो पावसामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसार झाले आहे त्यामुळे यंदाची दिवाळी सुद्धा शेतकऱ्यांची अंधारात जाणार अशी चर्चा होत असताना आता ठकरे सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पैसे मिळायलाच हवेत अशी तंबी कृषी मंत्री दादा भूसे यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेतंर्गत राज्यात काम करणाऱ्या ६ कंपन्यांच्या प्रतिनिधींना मंगळवारी झालेल्या बैठकीत दिली आहे.

 

काल रात्री उशीरापर्यंत झालेल्या या बैठकीत कृषी मंत्री भूसे तसेच कृषी सचिव एकनाथ डवले ऑनलाईन सहभागी झाले होते. कृषी आयुक्त धीरजकुमार, सांख्यिकी विभागप्रमुख विनयकुमार आवटे तसेच राज्यात काम करणाऱ्या सर्व कंपन्यांचे प्रतिनिधी बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित होते. जूलै ते सप्टेबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीत अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे.

 

तसेच यंदाच्या खरीप हंगामात पंतप्रधान पिक विमा योजनेत राज्यातील ८४ लाख शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यापैकी ३३ लाख ५२ हजार जणांनी नुकसान भरपाईसाठी विमा कंपन्यांकडे दावा दाखल केला आहे. त्यातील १० लाख जणांच्या नुकसानीचे अधिकृत पंचनामे झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे सहानुभूतीने पहा व दावे मंजूर करा, दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होतील असे पहा, त्यासाठी कर्मचारी वाढवावे लागतील तर वाढवा असे मंत्री भूसे यांनी बैठकीत उपस्थित विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना ठणकावून सांगितले.

Team Global News Marathi: