सोलापूर जिल्ह्यात आढळले 247 शिक्षक अन् कर्मचारी ‘पॉझिटिव्ह’ तर 17167 जणांची केली तपासणी

सोलापूर जिल्ह्यात आढळले 247 शिक्षक अन् कर्मचारी ‘पॉझिटिव्ह’ तर 17167 जणांची केली तपासणी

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. कोरोनामुळे नऊ महिने बंद असलेल्या मुक्या शाळा बोलक्या झाल्या.अखेर, शाळेची घंटा वाजल्यामुळे अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सोमवारी 23 नोव्हेंबर रोजी अनेक पालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तर कित्येकांनी आपली संमती दिली नाही. विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी संवेदनशील असणारे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी युद्धपातळीवर शासनाने घालून दिलेल्या नियमाची अंमलबजावणी केलीय.आज अखेर 247 शिक्षक आणि कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने चिंतेत भर पडली आहे.

जिल्ह्यातील तब्बल 17हजार 167 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची तपासणी करण्यात आली.त्यापैकी 247 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

बाधित शिक्षकांमुळे शाळेतील मुलांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. परंतु ज्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली.त्यांना पुढील वैद्यकीय उपचारासाठी पाठवण्यात आले अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: