” राजस्थानात चार दलितांना मंत्रिपद देणं हा तर काँग्रेसचा भंपकपणा”

 

मुंबई | राजस्थानात काँग्रेसने चार दलित नेत्यांना कॅबिनेटमध्ये स्थान दिलं आहे. दलितांवर प्रेम आहे म्हणून काँग्रेसने हा निर्णय घेतलेला नाही. केवळ निवडणुका पाहून काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचं दलितांवरील प्रेम हा दिखाऊपणा आणि भंकपपणा आहे, अशी टीका रिपाई नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

राजस्थानमध्ये अशोक गेहलोत सरकारचा आज विस्तार करण्यात आला. त्यात चार दलित नेत्यांना स्थान देण्यात आलं. त्यावरून काँग्रेस येणाऱ्या इतर राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दलित कार्ड खेळत असल्याचा आरोप केला जात आहे. केवळ निवडणुकीत काँग्रेसला दलित आणि ओबीसींची आठवण का येते? असा सवाल विरोधकांनी केला आहे

तसेच दलितांना पुढे आणत असल्याचं काँग्रेसचं धोरण हा केवळ दिखाऊपणा आहे. दलितांना त्यांचे हक्क मिळवून देण्यात काँग्रेस अपयशी ठरली आहे. त्यामुळेच 2014 मध्ये भाजपचं सरकार आलं, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. राजस्थान सरकारमध्ये कितीही फेरबदल केला तरी काहीच फरक पडणार नाही. राजस्थानात भाजपचंच सरकार येईल, असा दावाही आठवले यांनी केला आहे.

Team Global News Marathi: