पंजाबमध्ये ‘आप’ची जोरदार मुसंडी, अभिनेता सोनू सूदची बहीण पिछाडीवर

 

पंजाब |पंजाब विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून मतमोजणींनंतर निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे.सुरुवातीच्या कलांनुसार पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने जोरदार मुसंडी मारल्याचं दिसून येत आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्षाने सर्वाधिक जागांवर आघाडी घेतली आहे. आत्ताच्या हाती आलेल्या महिनीनुसार, ११७ जागांपैकी तब्बल ८६ जागांवर आम आदमी पक्षाने आघाडी घेतली आहे. काँग्रेस १६, अकाली दल ९ जागांवर, भाजप २ तर अपक्ष एका जागेवर आघाडीवर आहे.

या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सर्वात मोठा झटका बसला असल्याचं दिसत आहे. तर आम आदमी पक्षाने मुसंडी मारत इतरांना क्लीन स्विप दिल्याचं बोललं जात आहे. तसेच अभिनेता सोनू सूद याची बहिण मालविका मोगा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होती. काँग्रेस उमेदवार असलेली मालविका सध्या पिछाडीवर असल्याचं दिसून येत आहे.मोगा विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या १५ विधानसभेच्या निवडणुकांपैकी एकूण १० जागांवर काँग्रेसने विजय मिळवला होता.

१९७७ ते २०१७ या काळात काँग्रेस पक्षाने या मतदारसंघातून एकूण सहा वेळा विजय मिळवला होता.आत्तापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला सर्वाधिक जागांवर आघाडी मिळाली आहे. ही आघाडी पाहता पंजाबमध्ये आम आदमी पक्ष एक हाती सत्ता स्थापन करणार असल्याचं दिसून येत आहे.

Team Global News Marathi: