निकालापूर्वीच संजय राऊतांचा यु-टर्न; म्हणाले,”योगी पुढे जाणार हे नक्की होतं”

 

मुंबई | देर्शातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीचे निकाल आता समोर येण्यास सुरुवात झाली आहे. पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली असून दुपारपर्यंत निकालांचा कल स्पष्ट होईल. यामधील सर्वाधिक लक्ष हे उत्तर प्रदेशच्या निकालाकडे लागले आहे. त्यातच उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निवडणुकीच्या निकालापूर्वीच आपल्याच वाक्यावरून यु-टर्न केला आहे. त्यांनी उत्तर प्रदेशातील सुरुवातीच्या कलांवर प्रतिक्रिया देत, ‘योगी पुढे जाणार हे नक्की होतं, पण अखिलेश यादव यांची चांगली कामगिरी असल्याचे म्हटले आहे. उत्तर प्रदेशचा निकाल ५ नंतर स्पष्ट होईल त्यानंतर बोलणं योग्य ठरेल असे त्यांनी म्हटले आहे. तसेच गोवा आणि पंजाबमध्ये निकालांचे अंदाज बांधणं कठीण असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, निवडणुकीच्या अगोदर राऊत म्हणाले होते कि, ‘ उत्तर प्रदेशातील एकूण वातावरणामुळं मला वाटतं की, उत्तर प्रदेशात बदल दिसून येईल. लोकांनी त्यांची मनस्थिती निश्चित केली आहे. उत्तर प्रदेशात आम्ही जे वातावरण पाहिलं त्यावरुन असं दिसतंय की तिथं तोडीस तोड लढत होईल. अखिलेश यादवांना इथं जो पाठिंबा मिळतोय त्यावरुन उत्तर प्रदेशात बदल होताना दिसतोय’.

Team Global News Marathi: