अखेर पोलीस खात्यातून सचिन वाझे यांना करण्यात आले निलंबित

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ ठेवल्या प्रकरणात तब्बल १३ तासांच्यावर सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली होती. अखेर १३ तासांच्या चौकशीनंतर वाझे यांना NIA कडून अटक करण्यात आले होते. आता मिळालेल्या माहिती नुसार सचिन वाझे यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे.

एनआयए’च्या टीमने अटक केल्यानंतर सचिन वाझे यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने सचिन वाझे यांना २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. सचिन वाझे यांनी कोथडीत रवानगी झाल्यानंतर आता मुंबई पोलीस दलाकडून अखेर सचिन वाझे यांच्या निलंबनाची कारवाई केली आहे.

दरम्यान, सचिन वाझे ज्या मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाचा कार्यभार पाहत होते. तो संपूर्ण विभाग आता एनआयए’च्या रडारवर आला आहे. या प्रकरणी एकूण ४ पोलिसांची एनआयए’ने चौकशी केली आहे. पांढऱ्या इनोव्हा गाडी संदर्भात चौकशी करण्यात आली आहे. सचिन वाझेंच्या सांगण्यावरून गाडी नेली होती अशीमाहिती त्यांनी दिलेली आहे.

तसेच एनआयए’च्या टीमने सचिन वाझे यांच्या घरी धाड टाकली आहे. आज सकाळी एनआयए’च्या टीमने ही कारवाई केली. ठाण्यातील साकेत कॉम्पलेक्स येथे धाड टाकण्यात आली होती. या कारवाईमध्ये महत्वाचे पुरावे एनआयए’च्या हाती लागल्याची सूत्रांची माहिती आहे.

Team Global News Marathi: