उस्मानाबादमध्ये सुरु असलेल्या डान्सबार मुद्द्यावरून अमोल मिटकरी यांनी साधला निशाणा

 

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील डान्सबारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर एकाच खळबळ उडाली होती. त्यावरूनच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आक्रमक पवित्रा घेतला असल्याचं पाहायला मिळत आहे. तुळजापूर येथे एकीकडे आपण स्त्री शक्तीचा जागर करत असताना दुसरीकडे अशा प्रकारे डान्स बार सुरू असणं लज्जास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, डान्स बार सर्रास सुरु असून तुळजापुरमधील या प्रकाराचा निषेध व्यक्त करत आमदार अमोल मिटकरी यांनी हा मुद्दा आगामी अधिवेशनात मांडणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरही त्यांनी आपलं मत स्पष्ट केलं आहे. यावेळी त्यांनी भाजपवर सुद्धा निशाणा साधला होता.

औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून सध्या चांगलंच राजकारण पेटलं असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावर प्रतिक्रीया देताना शहरांची नावं बदलून विकास होत नसल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर ज्यांना नावं बदलायची आहेत त्यांनी गुजरातमधील नावं बदलून घ्यावी, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

Team Global News Marathi: