नागपुरात आज आणि उद्या मिनी लॉकडाऊन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय

नागपूर : संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. त्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोना सक्रिय होताना दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या चिंतेत अधिक भर वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर नागपुरात सुद्धा वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभामीवर नियम अधिक कडक करण्यात आले आहे.

शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा, मंगलकार्यालये, प्रतिष्ठाने, सिनेनागृहे, हॉटेल, रेस्टॉरंट, नाट्यगृहे आणि मॉलही बंद राहणार आहेत. प्रशासनाने त्याबाबतची माहिती दिली आहे. तसेच काय चालू राहणार आणि काय बंद याची माहिती प्रशासनाने नागरिकांना दिलेली आहे.

नागपुरात मागच्या २४ तासात १३९३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.त्यामुळे वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यात आज आणि उद्या मिनी लॅाकडाऊन करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून दोन दिवस जिल्ह्या बंदी लागू करण्या आलेलीआहे. फक्त चिकन, मटन शॉप, भाजीपाला, दूध विक्रीसह अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. तर, जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा, मंगलकार्यालये, प्रतिष्ठाने, सिनेनागृहे, हॉटेल, रेस्टॉरंट, नाट्यगृहे, मॉल, – शाळा, महाविद्यालये, आठवडी बाजार बंद राहणार आहेत.

Team Global News Marathi: