काळजी वाढवणारी बातमी; शुक्रवारी राज्यात 10 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची वाढ; 53 मृत्यु

MUMBAI, MAY 21 (UNI):- A health worker wearing a protective suit being thermal checking at Dharavi slum area during the nationwide COVID-19 lockdown, in Mumbai on Thursday. UNI PHOTO-N25U

काळजी वाढवणारी बातमी; शुक्रवारी राज्यात 10216 कोरोना रुग्णांची वाढ;53 मृत्यु

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) आज ६,४६७ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २०,५५,९५१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.५२% एवढे झाले आहे. आज राज्यात १०,२१६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.३८ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६६,८६,८८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,९८,३९९ (१३.१७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,१०,४११ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,२०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईतही आज १ हजार १७३ कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर ३ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. पण अॅक्टीव्ह रुग्णांचा विचार केला, तर मुंबईपेक्षा पुण्यातील सक्रीय रुग्णांची संख्या अधिक आहे. मुंबईत ९ हजार ५५ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत, तर तीच संख्या पुण्यात १८ हजाराहून जास्त आहे. एकंदरीतच राज्याचा विचार केला तर पुण्यातच अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यापाठोपाठ नागपूरचा क्रमांक लागतो. नागपूरमध्ये अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ११ हजार ५५२ वर पोहोचली आहे.

पुणे शहरात आज नव्याने ८३० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे शहरातील एकूण संख्या आता २ लाख ०६ हजार ३८३ इतकी झाली आहे.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण

राज्यात आज रोजी एकूण ८८,८३८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील

करोना बाधित रुग्ण

आज राज्यात १०,२१६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २१,९८,३९९ झाली आहे

 

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: