चंद्रकांत पाटील यांच्या टिकेनंतर संजय राऊतांचा पलटवार

नाशिक | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीतील भेटीवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील सुरु असलेले शाब्दिक युद्ध काही थांबायचे नाव घेत नाहीये. ‘चंद्रकांत पाटील हे लहान मुलासारखे आहे, आनंद घ्या, मुळात वाघाने खेळवले आणि लोळवले आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला लगावला आहे .

संजय राऊत उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘आमची मैत्री जंगलातल्या वाघाची आहे, पिंजऱ्यातल्या नाही’ असं वक्तव्य केलं होतं, या संदर्भात जेव्हा राऊत यांना विचारण्यात आले तेव्हा राऊत यांनी जोरदार टोला लगावला होता. चंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस आहे. ते गोड आणि निरागस आहेत. त्यामुळे त्यांनी काही म्हटलं तर लहान मुलासारखा आनंद घ्यायचा. वाघ ठरवेल कुणाशी मैत्री करायची की नाही. मुळात आतापर्यंत वाघाने खेळवले आणि लोळवले सुद्धा आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, राजकीय पक्ष वेगवेगळे असले तरी चंद्रकांत पाटील हे आमचे मित्र आहे. ठीक आहे ते आमच्यावर टीका करता, आम्ही त्यांच्यावर टीका करतो. पण, आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी घ्याव्यात, त्यांना गोडधोड खाऊ घालावे, केक कापावे, गोड माणूस आहे, अशी कोपरखळी राऊत यांनी लगावली होती. तसेच पक्ष संघटनेत शिथीलता यायला नको म्हणून हा दौरा करत आहे. कोरोनाच्या काळात लोकांना भेटता आले नाही त्यामुळे भेटीगाठी सुरू आहे, असंही राऊत यांनी सांगितले होते.

Team Global News Marathi: