राज्यात दिवसभरात ७११ तर मुंबईत 500 नवीन करोनाबाधितांची नोंद

एकट्या मुंबईत २४ तासांमध्ये ५०० पेक्षा अधिक नवीन करोनाबाधित सापडले

राज्यात दिवसभरात ७११ नवीन करोनाबाधितांची नोंद

राज्यात पुन्हा एकदा करोनाबाधित रूग्ण आढळत आहेत. आज दिवसभरात ७११ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,८७,०८६ एवढी झाली आहे.

याशिवाय आज ३६६ रुग्ण बरे होऊन घरी देखील परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,३५,७५१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची नोंद झालेली आहे.यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.०८% एवढे झाले आहे.

याचबरोबर, राज्यात आज एक करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद देखील झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,०९,२५,९४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,८७,०८६ (०९.७५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३४७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

#CoronavirusUpdates
31st May, 6:00pm

Positive Pts. (24 hrs) – 506
Discharged Pts. (24 hrs) – 218

Total Recovered Pts. – 10,43,710

Overall Recovery Rate – 98%

Total Active Pts. – 2526

Doubling Rate – 2355 Days

Growth Rate (24th May- 30th May)- 0.029%#NaToCorona

— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 31, 2022

मुंबईत २४ तासांत ५०६ नवीन करोनाबाधित –

एकट्या मुंबईत २४ तासांमध्ये ५०६ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. तर, २१८ जणांना रुग्णालयातून डिस्चार्च मिळाला आहे. आतापर्यंत मुंबईत एकूण १०,४३,७१० रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के आहे. तर, मुंबईतील अॅक्टीव्ह केसेसची संख्या २५२६ एवढी आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: