मानखुर्दमध्ये विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा मनसे उपाध्यक्ष सतीश नारकर यांच्या उपस्थितीत भव्य पक्ष प्रवेश !

 

मुंबई | मुंबई महानगर पालिका निवडणुकीला अवघे कही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली असून आता अनेक पक्षांमध्ये इतर पक्षातून जोरदार इन-कमिंग सुरु झाली आहे. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा येणाऱ्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरु केली असून इतर पक्षांना धक्का देण्यास सुरवात केली आहे.

त्यातच आता मानखुर्द छत्रपती शिवाजी महाराज नगर विधानसभा क्षेत्रात मनसे अध्यक्ष मा. श्री. राज साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपाध्यक्ष मा. सतीश रत्नाकर नारकर यांच्या उपस्थितीत भव्य पक्ष प्रवेश आयोजित करण्यात आला आहे. या प्रवेशामुळे येणाऱ्या मुंबई मनपा तसेच दोन वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मानखुर्दमध्ये पक्षाची ताकद कितीतरी पटीने वाढलेली दिसून येणार आहे.

या पक्षप्रवेशामुळे इतर पक्षांचे धाबे दणाणले असून सोमवारी दिनांक ७ फेब्रुवारी २०२२ रोजी मनसे कार्यालय, मानखुर्द येथे सायंकाळी ७:०० वाजता या भव्य पक्ष प्रवेशाचे आयोजन करण्यात आले आहे.

एकीकडे सत्तेत असलेले राजकीय पक्ष पुन्हा सत्तेत येण्यासाठी वेगवेगळी आश्वासने देत असताना दुसरीकडे नाशिक मनपाच्या धर्तीवर मुंबईचा विकास करण्याचे ध्येय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनाशी बाळगले आहे. याच पार्श्वभूमीवर आता सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश यापूर्वीच अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहे.

Team Global News Marathi: