महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका नेत्याला कोरोनाची लागण

राज्यात एकीकडे कोरोनाने आपलं डोकं वर काढलेले असताना दुसरीकडे महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख, राज्यमंत्री सतेज पाटील आणि मंत्री जयंत पाटील यांच्या नंतर आता अन्न आणि नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भातील माहिती त्यांनी स्वतः ट्विट करून दिलेली आहे.

माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी.माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.मास्क,सॅनिटायझर चा नियमित वापर करा. असं त्यांनी ट्विट केले आहे.

कालच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत नाशिक येथे राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. नाशिकच्या अलास्का बँक्वेट हॉलमध्ये हा विवाह सोहळा पार पडला होता. या सोहळ्याला पवार आणि भुजबळसह इतर राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Team Global News Marathi: