महाराष्ट्रात मागणीपेक्षा लसीचा पुरवठा कमी, आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली खंत

महाराष्ट्रात मागणीपेक्षा लसीचा पुरवठा कमी, आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली खंत

सिरम इन्स्टिट्यूट निर्मित कोविशील्ड या कोरोना प्रतिबंधक लसीला देशभरात आज पासून सुरवात झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झाल्यानंतर देशभरातील ठिकठिकाणी लसीकरणाला सुरवात झालेली आहे. मात्र आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पुन्हा एकदा कमी करोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा केल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.

महाराष्ट्राला १७.५० लाख करोना प्रतिबंधक लसींची आवश्यकता आहे. आठ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी कोविन अ‍ॅपवर रजिस्ट्रेशन केले आहे. आम्हाला करोना प्रतिबंधक लसीचे १० लाख डोस मिळाले. आम्हाला अजून साडेसात लाख लसींच्या डोसची आवश्यकता आहे” असे राजेश टोपे म्हणाले.

याआधी सुद्धा राजेश टोपे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी केंद्र सरकारने राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा आरोप फेटाळून लावला होता. सर्व राज्यांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या डेटाबेसनुसार त्यांना डोसची संख्या पाठवण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले होते.

“१६ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपूर्ण देशभरात लसीकरणाचं उद्घाटन करतील. महाराष्ट्रात दोन ठिकाणी पंतप्रधानांशी संवाद साधण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामधील एक कूपर रुग्णालय आणि दुसरं जालन्यातील जिल्हा रुग्णालय आहे. येथून पंतप्रधानांशी संवाद साधला जाणार आहे,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

“मी दोन दिवसांपूर्वी ते ५११ केंद्रांवर लसीकरणाचं नियोजन केलं होतं. पण कालच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्रालयाने इतक्या मोठ्या स्तरावर लसीकरण करु नका असं सांगितलं. इतर जो कार्यक्रम आणि गोष्टी सुरु ठेवणं गरजेचं असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे ५११ वरुन ही संख्या ३५० केली आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर १०० अशा पद्धतीने पहिल्या दिवशी ३५ हजार जणांना लस देण्याचा आमचा मानस आहे,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

ग्लोबल न्युज नेटवर्क: