पीएम केअर फंडाचा हिशेब द्या, 100 निवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मोदींना पत्र

पीएम केअर फंडाचा हिशेब द्या, 100 निवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मोदींना पत्र

ग्लोबल न्यूज: कोविडसारख्या आपत्कालीन स्थितीत आर्थिक चणचण भासू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु केलेल्या पीएम केअर फंडाच्या पारदर्शकतेबाबत साशंकता व्यक्त करत देशभरातील 100 निवृत्त प्रशासकीय अधिकाऱयांनी मोदींना पत्र लिहिले आहे. पीएम केअर फंडाचा हिशेब द्या अशी मागणी या निवृत्त अधिकाऱयांनी केली आहे.

आपत्कालीन परिस्थितीत वापरता येणारा पंतप्रधान नागरिक सहाय्य निधी म्हणजेच पीएम केअर फंड यामध्ये आतापर्यंत किती पैसे जमा झाले, हे पैसे कशाप्रकारे जमा करण्यात आले, किती पैसे खर्च करण्यात आले याबाबत लोकांना माहिती देणे गरजेचे असून याबाबत चौकशी केली असता प्रशासकीय विभागाकडून नागरिकांना सविस्तर माहिती दिली जात नाही. या व्यवहारात पारदर्शकता असणे आवश्यक असून तशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात यावी अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.

या पत्रात माजी आयएएस अधिकारी अनिता अग्निहोत्री, एस पी आंब्रोस, शरद बेहर, सज्जाद हसन, हर्ष मंदेर, पी जॉय ओम्मेन, अरुणा रॉय, मधु बहादुरी, के पी फॅबीअन, देब मुखर्जी, सुजाथा सिंग, माजी आयपीएस अधिकारी ए. एस. दौलत, पी. जी. जे. नंप्पुथीरी आणि ज्युलिओ रिबेरो यांच्यासह इतर अधिकाऱयांनी स्वाक्षऱया केल्या आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: