मध्यप्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांदीच्या मूर्ती, किंमत ऐकून हैराण व्हाल

 

मध्यप्रदेश | सध्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता काही अधिक पटीने वाढताना दिसून येत आहे, त्यात मोदी कुर्ता आणि मोदी जॅकेटनंतर थेट पंतप्रधानांच्या चांदीच्या मूर्ती बाजारात आल्या आहेत. मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांदीच्या मूर्तीची जोरदार चर्चा रंगली आहे.

आज तागायत आपण देवी देवतांच्या सोन्या-चांदीच्या मूर्ती आपण नेहमीच पाहतो पण आता मोदींची मूर्ती बाजारात आल्याने ती सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. इंदूरचे सराफा व्यापारी निर्मल वर्मा यांनी मुंबईतून ही मूर्ती तयार करून घेतली आहे . आपल्या दुकानातून या मूर्तीची विक्री करण्याचा वर्मा यांचा मानस आहे. नरेंद्र मोदींच्या 150 ग्राम मूर्तीची किंमत 11 हजार रुपये निर्धारीत करण्यात आली आहे. वेगवेगळ्या रंगांच्या कपड्यांत या मूर्ती असणार आहेत.

सध्या दोन मूर्ती आल्या आहेत. येत्या तीन ते चार दिवसांत आणखी पाच मूर्ती येतील असं म्हटलं आहे. ‘हर-हर मोदी, घर घर मोदी’ मोहिमेला त्यांना वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांदीच्या मूर्ती पाहण्यासाठी निर्मल वर्मा यांच्या दुकानासमोर सध्या लोकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी मोदी यांच्या चाहत्याने पुणे येथे मोदींचे मंदिर बनवले होते. मात्र विरोधकांच्या टिकेनंतर POM कार्यालयाने कारवाई केल्यानंतर मंदिर हटवण्यात आले होते.

Team Global News Marathi: