कोल्हापूर पोट निवडणुकीत आम आदमी पक्षाची माघार

 

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी १४ जणांनी १६ उमेदवारी अर्ज सादर केले. यामध्ये अपक्षांची संख्या जास्त आहे. आजवर १९ उमेदवारांनी २७ अर्ज भरले आहेत. आज शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यापासून अर्जांची छाननी सुरू होणार आहे. उमेदवारांच्या खर्चावर देखरेख करण्यासाठी इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमधील अधिकारी रविकांत चौधरी हे कोल्हापुरात दाखल झाले आहेत. अर्ज माघारीची मुदत २८ मार्चपर्यंत असून, १२ एप्रिलला मतदान व १६ एप्रिलला मतमोजणी आहे.

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत गुरुवारी जयश्री जाधव, सचिन प्रल्हाद चव्हाण यांनी काँग्रेसकडून, सत्यजित शिवाजीराव कदम यांनी भारतीय जनता पक्षाच्यावतीने तर बाजीराव सदाशिव नाईक, करुणा धनंजय मुंडे, संजय भिकारी मागाडे, अरविंद भिवा माने, भारत संभाजी भोसले,मुस्ताक अजिज मुल्ला, सुभाष जैनू देसाई, अस्लम बादशाजी सय्यद, मनिषा मनोहर कारंडे, राजेश सदाशिव कांबळे यांनी अपक्ष, शाहीद शहाजान शेख यांनी वंचित बहुजन आघाडीकडून अर्ज भरले.

अखेरच्या दिवशी अपक्षांनीच मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज सादर केले. आज शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.
उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी सकाळी अकरा ते दुपारी ३ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली होती; पण काही उमेदवार वेळ निघून गेल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आले.

Team Global News Marathi: