गोव्यात आपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आज ठरणार

 

गोवा| गोवा विधानसभा निवडणुकीची घोषणा मागच्या शनिवारी निवडणूक आयोगाने केली असून आता राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. गोव्यात भाजपाला टक्कर देण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीसह आम आदमी पक्ष मैदानात उतरले असून भाजपाला टक्कर देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मैदानात उतरले आहे.

अशातच आज आम आदमी पक्ष आज आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणार आहे. पक्षाचे प्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी रात्री दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर ही माहिती दिली. आम आदमी पक्षाने काल पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केला आहे.

आप गोव्यात मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार हा भंडारी समाजातील देईल असे यापूर्वी मनीष सिसोदिया यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आज अमित पालेकर, महादेव नाईक, रामराव वाघ की अन्य कुणाचे नाव जाहीर केले जाईल, याकडे आप कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, दाबोळी विमानतळावर केजरीवाल यांच्या स्वागतासाठी पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते.

Team Global News Marathi: