सर्वांना उमेदवारी मात्र भाजपाकडून पर्रीकरांच्या मुलाला देण्यासाठी तिकीटच नाही

 

गोवा| गोवा विधानसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक राहिलेले असताना आता राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. गोव्यात भाजपाला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरु केली आहे तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल मनोहर पर्रीकर यांना तिकीट डेन्स्यांतही भाजपाकडे तिकीट उरलेली नाहीये. अशी चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसून येत आहे.

सध्या सोशल मीडियावर भाजप समर्थकांचीच आणि भाजप कार्यकर्त्यांचीच जी चर्चा चाललीय, त्यावरून कळून येते, की पर्रीकर यांच्या मुलाला दुखवले गेल्यास पूर्ण गोव्यात आज देखील पर्रीकर समर्थकांना जखम होते. वेदना होते. पणजीत तर कार्यकर्ते जास्त जखमी होतात हे गेल्या काही दिवसांतील वाद-संवादातून अनुभवास आले.

मात्र दुसरीकडेकेवळ मनोहर पर्रीकर यांचा मुलगा आहे म्हणून तिकीट देता येणार नाही अशा अर्थाचे विधान बाजपा गोवा प्रभारी आणिराज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करायला नको होते, असे राज्यभरातील पर्रीकर समर्थकांना व कार्यकर्त्यांना वाटत असून ते आता उघड-उघड बोलायला लागले आहेत.

अर्थात जे झाले ते झाले, पण भाजपने आणखी आगीशी खेळण्याचा प्रयत्न करू नये. उत्पलना तिकीट नाकारणे हा आगीशी खेळ ठरतोय एवढ्या टप्प्यावर आता वाद आलेला आहे. उत्पलने आपण पणजीत अपक्ष राहाण्याचा निर्धार करत थेट रिंगणात उडीच टाकली आहे. एकूण काय तर आता होमखण पेटलेले आहे. त्यात भाजपमधील निष्ठावान व पर्रीकर समर्थक स्वत:ची बाजी लावायला सिद्ध होऊ लागले आहेत.

Team Global News Marathi: