“औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकणारे शिवसेनेसोबत येऊ शकत नाही” जलील यांच्या युतीच्या विधानाचा राऊतांनी घेतला समाचार

 

मुंबई | एमआयएमचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी भाजप पक्षाला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सोबत आघाडी करण्याची ऑफर दिली. एमआयएमने दिलेल्या या ऑफरवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे.

शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले, कुठली युती? कोणाबरोबर? महाराष्ट्रात तीन पक्षांचंच सरकार आहे आणि तीन पक्षांचंच सरकार राहणार. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचाराने चालणारे पक्ष आहेत. शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत असे त्यांनी माध्यमांशी बोलताना बोलून दाखविले होते.

पुढे ते म्हणाले की, एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या कबरीपुढे जाऊन गुढघे टेकतात आणि औरंगजेब त्यांचा आदर्श आहे ते महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाहीत. त्यामुळे ही अफवा आहे. भाजप – एमआयएमची छुपी युती एमआयएम आणि भाजपची छुपी युती आहे. ते तुम्ही उत्तरप्रदेशात पाहिलं आहे. बंगालमध्ये पाहिलं आहे. जे भाजपसोबत छुप्या युतीने काम करत आहेत त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचा कुठलाही संबंध येऊ शकत नाही. एमआयएम भाजपची बी टीमच आहे हे उत्तरप्रदेशातील निवडणुकीत स्पष्ट झालं आहे. जर त्यांना उत्तरप्रदेशात भाजपचा पराभव करायचा होता तर त्यांनी काळजीपूर्वक पावलं टाकायला हवी होती.

Team Global News Marathi: