चक्क पुण्यात एकाच दिवसात आढळले २५०० रुग्ण, संपूर्ण प्रशासन हादरले

संपूर्ण देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने आपले हात पाय पसरायला सुरवात केली आहे. एकीकडे संपूर्ण देशभरात लसीकरण सुरु झालेले असताना दुसरीकडे मात्र पुन्हा एकदा कोरोनाचा आलेख वर चढताना दिसत आहे. त्यात कोरोना बाधित जिल्ह्याची संख्या महाराष्ट्रात जास्त प्रमाणात आहेत.

त्यात पुण्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या स्फोट झालेला पाहायला मिळत आहे. बुधवारी एकाच दिवसात पुण्यात २५८७ रुग्ण आदळून आल्यामुळे पुणे महानगर पालिका चांगलेच हादरून गेले आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी या संदर्भात एक विशेष बैठक बोलावली आहे. या बैठकीत नवे निर्बंध लादले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिवसभरात वाढलेल्या रुग्णसंख्येच्या आकड्यामुळे मनपा प्रशासनं हादरले आहे. आज महापौर, शहरातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या बैठकीत कोरोनाला आळा घालण्यासाठी नवे निर्बंध काय असावेत, यावर चर्चा करणार आहे. महापौर, महापालिका आयुक्त, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि महापालिकेचे तीन अतिरिक्त आयुक्त बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

पुण्यात दिवसभरात २५८७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. यातील ५७३ रुग्णांचे अहवाल मागील काही दिवसांपासून प्रलंबित होते. नवे कोरोनाग्रस्त आढळण्याचे प्रमाण आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण याकडे पाहिले, तर पुण्यात कोरोना महामारीची स्थिती चिंताजनक असल्याचे दिसून येते.

Team Global News Marathi: