बंगालमध्ये भाजपाल मोठा धक्का !तब्बल २४ आमदार तृणमूलच्या संपर्कात

 

पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणूक पार पडल्या तरी अद्याप ममता बनेर्जी भाजपामध्ये यांच्या वादामुळे तेथील राजकारण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच पश्चिम बंगालमधील भाजपचे आमदार सौमेन रॉय पुन्हा टीएमसीमध्ये परतल्यानंतर, आता तृणमूल नेते मुकुल रॉय यांनी, येणाऱ्या काळात अनेक भाजप आमदार टीएमसीमध्ये सामील होऊ शकतात, असा दावा केला आहे.

रॉय म्हणाले, ममता बॅनर्जी यांच्यासोबत काम करू इच्छिणारे २४ आमदार त्यांच्या संपर्कात आहेत. तसेच, टीएमसीमध्ये येऊ इच्छिणाऱ्या नेत्यांची मोठी रांग आहे. गेल्या चार आठवड्यांत सौमेन रॉय, विश्वजित दास आणि तन्मय घोष यांच्यासह भाजपचे चार आमदार टीएमसीमध्ये सामील झाले आहेत. विशेष म्हणजे, हे सर्वच मुकुल रॉय यांच्या जवळचे मानले जातात आणि हे सर्व २०२१ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी, मुकुल रॉय यांच्यामुळेच भाजपमध्ये सामील झाले होते.

गेल्या आठवड्यात पार्थ चॅटर्जी यांच्या उपस्थितीत सौमेन रॉय यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. यापूर्वी ३० ऑगस्ट रोजी बिष्णुपूरचे आमदार तन्मय घोष टीएमसीमध्ये परतले. दुसऱ्याच दिवशी, उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बागडा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार विश्वजित दासही टीएमसीमध्ये सामील झाले. सौमेन रॉय टीएमसीमध्ये सामील झाल्यामुळे, आता बंगाल विधानसभेत भाजपच्या आमदारांची संख्या ७१ वर आली आहे.

Team Global News Marathi: