“संजय राऊतांना अटक करा; त्यांना पुण्यात फिरू देणार नाही”

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेनंतर राणेंना अटक त्यानंतर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर राज्यात जोरदार राडा झालेला पाहायला मिळाला होता. माता दुसरीकडे आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कोटला बाहेर काढलेल्या विधानावरून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता भाजपने करून आघाडी सरकारच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

‘कोथळा बाहेर काढू हे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेलं कथित विधान धमकवणारं आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणारं आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करावी तसेच ‘खासदार संजय राऊत यांनी माफी मागितली नाही, तर त्यांना अन्यथा पुण्यात फिरू देणार नाही, असा इशाराही भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी ‘आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही, तर कोथळा बाहेर काढतो’, असं विधान केलं होतं. या विधानावर पुणे भाजपने आक्षेप घेतला आहे. डेक्कन पोलीस ठाण्यात सोमवारी (6 सप्टेंबर) यासंदर्भात शहर भाजपाच्या वतीने तक्रार अर्ज दाखल करण्यात आला.

त्यानंतर पत्रकार परिषदेत मुळीक म्हणाले, ‘संजय राऊत हे केवळ एक बोरुबहाद्दर आहेत. वादग्रस्त वक्तव्य करून राजकारण करत असतात. ते प्रत्यक्ष फिल्डवर कधीही काम करत नाहीत. त्यांच्यात निवडणूक लढविण्याची हिंमत नाही. कोथळा बाहेर काढू ही एक प्रकारे धमकी आहे, ती आम्ही खपवून घेणार नाही’, असं मुळीक यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: