बीडमध्ये पंकजाताई मुंडे यांचा राष्ट्रवादी पक्षाला जोरदार धक्का

 

बीड | बीड जिल्ह्यात पार पडलेल्या पाच नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये प्रतिष्ठितांना धक्का देत निर्णायक निकाल हाती आले आहेत. आष्टी, पाटोदा, शिरूर नगरपंचायतमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवत महाविकास आघाडीचा दणदणीत पराभव केला आहे. हा पालकमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का समजला जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेत पुन्हा एकदा सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली पंकजा मुंडेनी बाजी मारली आहे. केज नगरपंचायतमध्ये काँग्रेसच्या ताब्यातील नगरपंचायत जनविकास आघाडीच्या ताब्यात गेली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार रजनीताई पाटील यांना पराभव सहन करावा लागला आहे.

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय भाजपाचे ज्येष्ठ नेते राजू भाऊ मुंडे यांच्या ताब्यातील वडवणी नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्यामुळे भाजपला एक मोठा धक्का समजला जात आहे. निवडणूक निकालानंतर पत्रकार परिषद घेत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना सणसणीत टोला लगावला आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, सत्ता असून देखील यश मिळवणं कठीण झालंय. भाजपला लोकांनी चांगली साथ दिली आहे. बीडमध्ये सर्व नगरपंचायतींमध्ये भाजपचे वर्चस्व आहे असं त्यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: