“सर्वच गोष्टीत भाजपाचा हात आहे वाटत असेल तर.”

 

नाशिक | त्रिपुरा येथे अल्पसंख्याकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यात पुकारण्यात आलेल्या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण होते. नांदेड आणि अमरावती जिल्यात याच पडसाद दिसून आले होते याच आक्रमक आंदोलकांनी दुकानांवर दगडफेक करत तोडफोड केली. या हिंसक कार्यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनीही दगडफेक करणाऱ्यांवर लाठीचार्ज केला आहे. याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘पाच टक्के मुस्लीम त्यांच्या नेत्यांच्या चिथावणीला बळी पडून हिंसक आंदोलन करतात त्यावर तुम्ही टीका पण करणार नाही का? प्रत्येक विषयात तुम्हाला भाजपाच दिसते. आमच्या शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेली. एसटी कामगारांवर इतका अमानवीय अन्याय महाराष्ट्राराने कधी पाहिला नाही. यामध्ये भाजपाचा हात असेल तर तुम्ही तिघे समर्थ आहात भाजपाचा हात कापून काढण्यासाठी. तुम्ही तिघे एकत्र असूनही दुबळे आहात आणि आम्ही श्रेष्ठ आहोत असे तुम्हाला म्हणायचे आहे,’ असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, यामध्ये सरकारला अपयश येत नाही. सरकारने थांबण्याचा प्रयत्न केला तर मते जातील. राजकारणात आल्यावर याचे गणित कळेल. गृहमंत्री आजारपणातून बाहेर पडले आहेत. मुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये आहेत. पण सरकार बाहेरून चालवणारे आहेत,’ अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच त्रिपुरात घडलेल्या घटनेचा निषेध अमरावतीमध्ये करायचा. अशी परंपराच आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा परदेशात घटना घडली की कोलकातामध्ये दंगल व्हायची. लोकशाही मध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण शांततेने करा असा सल्ला देखील पाटील यांनी यावेळी दिला.

Team Global News Marathi: