“२०१९ मध्ये महापुराच्या पाहणीसाठी फडणवीस ८ दिवसांनी आले होते”

 

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पडणाऱ्या धो-धो पासवसामुळे स्थानिक जनजीवन विस्कळीत झाले होते. तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडायला सुरवात केली आहे. आता याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री मुश्रीफ यांनी २०१९ महापुराच्या मुद्द्यावरून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

सांगलीनंतर कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापुरात दाखल झाले आहेत. अजित पवार यांनी शाहूपुरी आणि पंचगंगा नदी परिसरात पूरस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेण्यात आली.

दरम्यान, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी महापुराच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केलीय. २०१९ च्या महापुराच्या पाहणीसाठी देवेंद्र फडणवीस 8 दिवसांनी आले होते, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला आहे.

Team Global News Marathi: