चैत्यभूमीजवळील बेकायदा बांधकाम रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर करण्यात आले उधवस्त !

मुंबई : चैत्यभूमीला लागून असलेल्या धर्मशाळेच्या इमारतीवर दुरुस्तीच्या नावाने चढवण्यात आलेला अनधिकृत बांधण्यात आलेला एक मजला अखेर रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यामुळे महापालिका व पोलिसांनी संयुक्त कारवाई करून उद्ध्वस्त केल्याची माहिती मुंबई रिपब्लिकन पक्षाने दिली आहे.

राजकीय आशीर्वादाने उभारण्यात आलेल्या ३० फूट उंचीच्या अनधिकृत बांधकामामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असलेले स्तूप झाकले जात होते. मुंबई महापालिका व शिवाजी पार्क पोलिसांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपूर्वीच ही कारवाई केल्यामुळे सामाजिक सलोखा राखण्यास मदत झाली आहे, अशी प्रतिक्रिया सोनावणे यांनी दिली आहे.

चैत्यभूमी प्रवेशद्वाराजवळ धर्मशाळा आहे. त्यांच्या दुरुस्तीच्या नावाखाली मुंबई मनपाने कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत मजला उभारण्यात आला होता. त्यामुळे चैत्यभूमी झाकली जात होती. या संदर्भात महापालिकेकडे तक्रार करण्यात आल्यानंतर व कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर शनिवारी महापालिकेचे अधिकारी व पोलिसांनी संयुक्त कारवाई करून हे बेकायदा बांधकाम तोडल्याचे त्यांनी सांगितले.

Team Global News Marathi: