लाॅकडाऊनबाबत विजय वडेट्टीवार यांचे मोठे विधान

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. त्यात वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकारच्या अडचणीत अधिक भर घालणारी आहे. त्यातच मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गंभीर इशारा दिला आहे. राज्यात सध्या लाॅकडाऊन नको. मात्र, कठोर निर्बंध लावावे लागतील. लोकल वेळापत्रक रिशेड्युल करावं लागेल. मंगल कार्यालयावर वाॅच ठेवावा लागेल, असं वडेट्टीवार यांनी बोलून दाखविले.

राज्यात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. फक्त महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यातच देशातील एकूण ६५ ते ७० टक्के रुग्ण आहे. हे दोन्ही राज्य हाॅटस्पाॅट झाले आहेत. पण लाॅकडाऊन करावे लागेल असं मला वाटत नाही. अजून निर्बंध लावावे लागतील हे नक्की, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच गर्दी कमी करावी लागेल. मार्केटमध्ये निर्बंध आणावे लागतील. सिनेमाघर बंद करावी लागतील. परिक्षांबाबत तामिळनाडू सरकारने सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रालाही याबाबत निर्णय घ्यावा लागेल. असं विजय वडेट्टीवार यांनी यावेळी बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: