माफिया सेनेत दम असेल तर मला हात लावून दाखवा -किरीट सोमय्या

 

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या माफिया सेनेची इज्जत गेली आहे. गोवा, उत्तर प्रदेशातील जनतेने त्यांना दाखवून दिलं आहे. संजय राऊत यांच्यामार्फत स्टंट करून काहीही साध्य होत नाही. नील सोमय्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना राज्य सरकारनं नील सोमय्यांची कुठलंही चौकशी करत नसल्याचं सांगितले. उच्च न्यायालयात ठाकरे सरकारनं स्वत:ची इज्जत घालवून घेतली असा टोला भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्यांनी शिवसेनेला लगावला.

किरीट सोमय्यांनी राऊतांवर निशाणा साधला ते म्हणाले की, संजय राऊत यांनी नील सोमय्यांविरोधात दिलेल्या कागदपत्रांचे पुढे काय झाले? हायकोर्टाने ठाकरे सरकारला लोटांगण घालावे लागले. नीलवर तुम्ही जो अत्याचार केला त्याचा हिशोब सोमय्या नक्की घेणार असा इशारा त्यांनी शिवसेना आणि संजय राऊतांना दिला.

तसेच संजय राऊत तुमच्या माफिया सेनेत दम असेल तर मला हात लावून दाखवा. पुण्यात शिवसेनेनं ७७ गुंड मला मारण्यासाठी पाठवले त्यातील ३० मुंबईतले होते असा आरोपही सोमय्यांनी केला. तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांनी नील सोमय्या यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले होते. त्या आरोपांची चौकशी मुंबई पोलीस करणार असल्याचं ते म्हणाले.

Team Global News Marathi: